Crime

Crime News : CET Cell परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना 9 लाखांचा गंडा; 18 विद्यार्थ्यांचे फोनमधले सिम फेकून दिले, नेमकं प्रकरण काय?

सीईटी परीक्षेत विद्यार्थ्यांना 9 लाखांचा गंडा; मोबाईल सिम व कार्ड्सची चोरी, नेमकं काय घडलं?

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र सीईटी सेल (Maharashtra CET Cell) विद्यार्थ्यांवर लक्ष्य केंद्रित करत चोरट्यांनी अनोख्या पद्धतीने मोठा आर्थिक फटका दिला आहे. श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज Satara आणि देवगिरी महाविद्यालय Chhatrapati Sambhaji Nagar परिसरातील २ आणि ३ मे रोजी सीईटी सेलची परीक्षा होती. या परीक्षेसाठी आलेल्या 18 विद्यार्थ्यांच्या दुचाकी आणि चारचाकींच्या डिक्या फोडल्या. तेवढचं नाहीतर, परीक्षेला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या फोनचे सिमकार्ड, एटीएम व क्रेडिट कार्ड चोरले गेले. ही चोरी चोरट्यांनी अवघ्या तासाभरात केली असून विद्यार्थ्यांना 9 लाखांचा गंडा घातला.

फक्त सिमकार्ड व कार्ड्सच चोरले, मोबाईल फेकून दिले!

या चोऱ्यांमध्ये एक विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी मोबाईल फोडून त्यामधील सिमकार्ड SIM Card, एटीएम ATM व क्रेडिट कार्ड Credit Card काढले. मोबाईल तसाच फेकून दिला. विद्यार्थी परीक्षा केंद्रात परतल्यावर त्यांना त्यांच्या फोनमधील सिम गायब असल्याचे लक्षात आले. काही विद्यार्थ्यांनी सिम बंद करून खात्यातील हालचाल तपासली असता, पैसे गायब झाल्याचे लक्षात आले.

नेमंकी चोरी कशी केली?

सिमकार्ड आणि कार्ड्स चोरल्यानंतर ‘फरगेट पिन’ पर्यायाचा वापर करत नवीन पिन निर्माण केला.

नवीन पिनच्या साहाय्याने एटीएममधून रोख रक्कम काढली

क्रेडिट कार्डद्वारे मॉलमध्ये व ऑनलाइन खरेदी

एका तासात ५५ हजारांचे कपडे खरेदी, प्रोझोन मॉलमध्ये व्यवहार

नेमकं प्रकरण काय?

चोरट्यांना परीक्षा केंद्रावर वेळेची माहिती आधीच माहिती असल्याचे समजते आहे. परीक्षा देणारे काही विद्यार्थी नोकरी करणारे त्याच्या खात्यामध्ये बरीच रक्कम होती. ही चोरी सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणाबद्दल माहिती उस्मानपूरा आणि सातारा पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा सायबर सेल करत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा