तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील न्यायालयाने ८० रुपयांच्या किरकोळ वादातून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी ६० वर्षीय वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये घडलेल्या या जघन्य गुन्ह्यात सोमवारी हा निकाल देण्यात आला. रंगारेड्डी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी हा निकाल दिला.
नेमकं प्रकरण काय?
फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, ही घटना २० फेब्रुवारी २०२३ रोजी घडली. आरोपी दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने त्याच्या ५० वर्षीय पत्नीला दारू खरेदी करण्यासाठी ८० रुपये मागितले. जेव्हा तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तो संतापला. रागाच्या भरात आरोपीने प्रथम आपल्या पत्नीला काठीने मारहाण केली. नंतर, त्याने तिला झोपडीत ओढले आणि तिच्या छातीवर आणि चेहऱ्यावर दगडाने वारंवार वार केले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
एका दुसऱ्या घटनेत, उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका २० वर्षीय तरुणाची त्याच्या मित्रांनी निर्घृण हत्या केली. ओळख लपवण्यासाठी त्यांनी त्याचे डोके शरीरापासून वेगळे केले आणि शेजारच्या महाराजगंज जिल्ह्यात फेकून दिले. सोमवारी पोलिसांनी मृतदेहाचे अवयव जप्त करून या खळबळजनक हत्याकांडाची उकल केली.
फक्त ८० रुपये न दिल्याने पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली.
न्यायालयाने आरोपी ६० वर्षीय वृद्धाला जन्मठेप सुनावली.
काठीने मारहाण करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.
गोरखपूरमध्येही २० वर्षीय तरुणाचा मित्रांनी खून करून डोके वेगळे केले.