Crime

अजब ! सोशल मीडियावर शिकला घरफोडी ; आर्थिक तंगीने ग्रासलेल्या तरुणाने स्वीकारला गुन्हेगारीचा मार्ग

वाहरनगर पोलिसांनी त्याला अटक करत दोन महागडे मोबाइल व एक लॅपटॉप जप्त केला आहे.

Published by : Shamal Sawant

हातची नोकरी गेली, घरातून हकालपट्टी झाली आणि आर्थिक तंगीने ग्रासलेल्या तरुणाने थेट गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला. सोशल मीडियावर घरफोडीचे 'धडे' गिरवत वैजापूरचा अक्षय गजानन थोरात (२८) याने शहरात घरफोड्या सुरू केल्या. जवाहरनगर पोलिसांनी त्याला अटक करत दोन महागडे मोबाइल व एक लॅपटॉप जप्त केला आहे.

10 मार्च रोजी श्रीकृष्णनगर येथे ओंकार निधोनकर यांच्या मित्राच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला. शहानुरमिया दर्गा चौकातील एका रसवंतीवर काम करणारा संशयित मिळून आला आणि खात्री झाल्यावर उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

घरच्यांचा विश्वासघात अन् कर्जाचा डोंगर

अक्षयने दोन महिन्यांपूर्वी गावात परतल्यानंतर वडिलांची व भावाची दुचाकी परस्पर विकून दीड लाख रुपयांचे कर्ज बुडवले होते. घरच्यांनी त्याला घराबाहेर काढल्यानंतर त्याने राहत्या घराचे भाडेदेखील थकवले. या सर्व घटनांनी निराश झालेल्या अक्षयने सोशल मीडियावर चोरीचे व्हिडीओ पाहून घरफोडी करण्याचे बेत आखले.

न्यायालयात वडिलांचे अश्रू

अक्षयच्या अटकेनंतर न्यायालयात आलेल्या वडिलांना आपल्या मुलाच्या कृत्यामुळे अश्रू अनावर झाले. पोलिस तपासात त्याने खोटी बिले तयार करून चोरलेला लॅपटॉप व मोबाइल विकण्याचा प्रयत्न केल्याचेही उघड झाले आहे. त्याच्यावर आणखी घरफोडी व सोनसाखळ्या चोरीचे आरोप असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पोलिसांचा तपास सुरू

ही कारवाई सहायक आयुक्त डॉ. रणजित पाटील, निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत मुंडे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश