PUNE CRIME ALERT: STUDENT ASSAULTED OUTSIDE BJ’S COLLEGE IN WAGHOLI, CITIZENS DEMAND SECURITY 
Crime

Pune Crime: वाघोलीत कॉलेज समोर गुंडगिरी; विद्यार्थ्यांवर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Wagholi BJS College: पुण्यात वाघोली येथील बीजेएस कॉलेजसमोर चार अज्ञात व्यक्तींनी विद्यार्थ्यावर मारहाण केली.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

पुण्याच्या वाघोली येथील बीजेएस कॉलेजच्या बाहेर चार अज्ञात व्यक्तींनी एका विद्यार्थ्याला तीव्र मारहाण केली. या घटनेमुळे कॉलेज परिसरात भीतीचे सत्र पसरले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून स्थानिकांमध्ये संतापाची लहर उसळली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागात पूर्वीपासूनच हाणामाऱ्या आणि गुंडागर्दीच्या घटना सतत घडत आहेत. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी देण्यात आल्या, मात्र पोलिसांकडून पुरेशी कारवाई झालेली नाही. यामुळे गुंडांचे बळ धीराने वाढत असल्याचा आरोप होत आहे आणि नागरिकांमध्ये पोलिसांबाबत नाराजी वाढली आहे.

घटनेनंतर नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांनी संबंधित आरोपींवर तात्काळ कायदेशीर कारवाई, कॉलेज परिसरात नियमित पोलिस गस्त आणि कायमस्वरूपी सुरक्षा बंदोबस्ताची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस प्रशांत जमदाडे यांनी या मागण्यांचे निवेदन पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहे.

  • वाघोली बीजेएस कॉलेज समोर विद्यार्थ्यावर चार अज्ञात व्यक्तींनी हल्ला

  • परिसरातील नागरिक आणि पालकांमध्ये अस्वस्थता आणि संतापाची लहर

  • पोलिसांकडून पुरेशी कारवाई न झाल्याने गुंडांचा धीर वाढल्याचा आरोप

  • नागरिकांनी कायमस्वरूपी सुरक्षा, नियमित पोलिस गस्त आणि तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी केली

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा