Supriya Sule 
महाराष्ट्र

Supriya Sule : 'उद्ध्वस्त'…'; अजित पवार यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Supriya Sule ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

अजित पवारांसह या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची मिळत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

अजित पवारांची धडाडीचे नेते म्हणून देशभरात ओळख होती. विमानाचे बारामतीमध्ये लँडिंग होताना झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली आणि विमान जळून खाक झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. 'उद्धवस्थ…' असे लिहित सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेटस ठेवला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा