Mumbai BJP 
मुंबई

Mumbai BJP : मुंबई पालिका परिसरात भाजपकडून बॅनरबाजी; मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात, बॅनरवर उल्लेख

महापालिका निवडणुकींच्या निकालानंतर लक्ष लागले होते ते म्हणजे मुंबईचा महापौर कोण होणार? महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Mumbai BJP ) महापालिका निवडणुकींच्या निकालानंतर लक्ष लागले होते ते म्हणजे मुंबईचा महापौर कोण होणार? महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. त्यानंतर मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपाकडून रितू तावडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. तर उपमहापौरपदासाठी शिंदेसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

आज रितू तावडे महापौरपदी विराजमान होणार आहेत. आज दुपारी 12 वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आले असून शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे नगरसेवक जल्लोष करणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पालिका परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई भाजपाने जय्यत तयारी केली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात झेंडे लावण्यात आले आहेत. मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात असा या बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.

Summary

  • मुंबई पालिका परिसरात भाजपकडून बॅनरबाजी

  • मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात, बॅनरवर उल्लेख

  • महापौर, उपमहापौर निवडीची आज औपचारिकता

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा