लोकशाही स्पेशल

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमधील फरक तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Published by : Siddhi Naringrekar

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आज शासकीय कार्यालये, संस्था, दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तयारी सुरू झाली आहे.

ध्वजारोहणामध्ये काय फरक आहे?

स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणात तिरंगा दोरीच्या मदतीने खालून वरच्या दिशेने खेचून मग तो उघडला जातो.

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज स्तंभाच्या वरच्या बाजून बांधला जातो. आणि त्यामध्ये फुलं टाकून तो थेट फडकवला जातो.

स्वातंत्र्य दिनी जे झेंडावंदन केलं त्याला ध्वजारोहण असं म्हणतात. तर प्रजासत्ताक दिनी केलेल्या झेंडावंदनाला ध्वज फडकवला असं म्हणतात.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर प्रजासत्ताक दिनाला राजपथावर ध्वज फडकावला जातो.

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामधला फरक काय?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश ब्रिटीश साम्राज्यातून मुक्त झाला. त्यामुळे यादिवशी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. तर २६ जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. कारण २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आणले गेले होते. भारत हा जगातील एकमेव देश आहे. जो दोन-दोन राष्ट्रीय सण साजरे करतो.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा