Dinvishesh
Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : चीनने प्रथमच केली ‘हायड्रोजन बॉम्ब’ची चाचणी

Published by : Team Lokshahi

आज जागतिक रक्तदान दिन : ऑस्ट्रेलियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीनर यांचा आज जन्मदिन. दरवर्षी त्यांचा जन्मदिन हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांनी मानवी रक्ताचे नमुने घेऊन विविध रक्त गटांचा A-B-O-AB असा शोध लावला. यासाठी त्यांना नोबल पारितोषिक देण्यात आले.

सुविचार

एक चांगलं पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवू शकते.

आज काय घडले

  • १८९६ मध्ये थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ मुलांसाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्री शिक्षण संस्था, एसएनडीटी महिला विद्यापीठ असे उपक्रम सुरु केले.

  • १९४५ मध्ये ब्रिटीश अधिकारी वेव्हेल यांच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र देण्यासंबंधी वेव्हेल योजना जाहीर करण्यात आली.

  • १९६७ मध्ये चीनने प्रथम ‘हायड्रोजन बॉम्ब’ ची चाचणी केली.

आज यांचा जन्म

  • जैन धर्मीय श्वेतंबर तेरापंथ आदेशाचे दहावे प्रमुख, संत, तत्वज्ञ, लेखक,आचार्य श्री महाप्रज्ञ यांचा १९२० मध्ये जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला.

  • अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांचा १९४६ मध्ये जन्म झाला. २०१६ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून त्यांनी राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

  • भारतीय दूरचित्रवाणी व सिने-अभिनेत्री किरण खेर यांचा १९५५ मध्ये जन्म झाला. १९८८ मध्ये पेस्तनजी या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण

  • केले.

  • भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचा १९६७ मध्ये जन्म झाला.

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा १९६८ मध्ये जन्म झाला. शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत.

आज यांची पुण्यतिथी

  • मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचे १९१६ मध्ये निधन झाले. त्यांच्या मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.

  • भारतीय नोबल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांचे शिष्य भौतिकशास्त्रज्ञ सर करिमानीक्कम श्रीनिवास कृष्णन यांचे १९६१ मध्ये निधन झाले. त्यांना पद्मभूषणने गौरविण्यात करण्यात आले होते.

  • मराठी अभिनेत्री संस्कृत पंडित सुहासिनी मुळगावकर यांचे १९८९ मध्ये निधन झाले. दूरदर्शनवर होणाऱ्या संगीतविषयक कार्यक्रमांच्या त्या निर्मात्या असत.

  • भारतीय सिने-अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचे २०२० मध्ये निधन झाले. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या सुशांत यांनी २०१३ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक