Dinvishesh
Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले: सिमला करारावर झाल्या स्वाक्षऱ्या

Published by : Team Lokshahi

बरोबर 42 वर्षांपूर्वी 2 जुलैच्या दिवशी भारत आणि पाकिस्तान या सख्ख्या शेजाऱ्यांमध्ये 'सिमला करार' झाला होता. त्यावेळी या करारापेक्षा चर्चा बेनझीर भुत्तो यांचीच होती. बेनझीर आपल्या वडिलांबरोबर त्यावेळी आल्या होत्या.

सुविचार

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस.

आज काय घडले

  • १९४० मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना इंग्रज सरकारने कलकत्ता इथे त्यांच्या राहत्या घरी स्थानबद्ध केले.

  • १९७२ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

  • १९८३ मध्ये तामिळनाडूमधील कल्पक्कम या ठिकाणी अणुउर्जा केंद्राची स्थापना करण्यात आली.

आज यांचा जन्म

  • श्रेष्ठ गायक, नेट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा अहमदनगर िजल्ह्यातील शेवगाव येथे १८८० मध्ये जन्म झाला.

  • भारतीय चित्रपट पार्श्वगायक मुहम्मद अझीज यांचा १९५४ मध्ये जन्म झाला. त्यांनी वेगवेगळ्या भाषेत २० हजारापेक्षा जास्त गाणी गायीले.

  • हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील प्रसिद्ध लखनऊ तबला घराण्यातील गायक पंडित संतोष जोशी यांचा १९६० मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • होमिओपॅथीचे जनक सामुएल हानेमान यांचे १८४३ मध्ये निधन झाले. त्यांनी १७९३ व १७९९ च्या दरम्यान औषधी शास्त्रविषयक बरेच नवे ग्रंथ लिहिले.

  • समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे १९५० मध्ये निधन झाले.

  • क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे २००७ मध्ये निधन झाले. त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

  • माजी केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते व माजी कम्युनिस्ट पक्षाचे नेता चतुरानन मिश्रा यांचे २०११ मध्ये निधन झाले.

  • संगणक माउसचे जनक अमेरिकन अभियंता आणि शोधक डग्लस कार्ल एंगेल्बर्ट यांचे २०१३ मध्ये निधन झाले.

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत