Dinvishesh
Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : ॲपलचा पहिला स्मार्ट फोन बाजारात

Published by : Team Lokshahi

सुविचार

प्रत्येकाच्या मनात एकआदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

आज काय घडले

  • १९७६ मध्ये आफ्रिका खंडातील सेशेल्स या देशाला इंग्लंडपासून स्वातंत्र मिळाले. सेशेल्स हा आफ्रिका खंडातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे.

  • १९८६ मध्ये मेक्सिकोमध्ये आयोजित फुटबॉल विश्वचषक अर्जेंटिनाने जिंकला. पाश्चिम जर्मनीचा अर्जेंटिनाने ३-२ असा पराभव केला होता.

  • २००७ मध्ये आयफोन म्हणून प्रसिद्ध असलेला ॲपल कंपनीचा पहिला स्मार्ट फोन बाजारात विक्रीस उपलब्ध झाला.

आज यांचा जन्म

  • आद्य विनोदी लेखक, नाटककार, कवी व समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा १८७१ मध्ये जन्म झाला. ‘बहु असोत सुंदर, संपन्न की महा’ या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित आहेत.

  • भारतातील संख्याशास्त्रज्ञ जनक प्रशांत चंद्र महालनोबिस यांचा १८९३ मध्ये जन्म झाला. त्यांना भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यासाठी ओळखले जाते.

  • बडोदा प्रांताचे राजा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नातू व बडोदा प्रांताचे शेवटचे सत्ताधीश महाराज प्रतापसिंह राव गायकवाड यांचा १९०८ मध्ये जन्म झाला.

  • नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक कमलाकर सारंग यांचा १९३४ मध्ये जन्म झाला. सखाराम बाइंडर व इतर अनेक नाटकांतील त्यांचा अभिनय विशेष गाजला.

आज यांची पुण्यतिथी

  • १९व्या शतकातील महान बंगाली भाषिक कवी आणि नाटककार व बंगाली नाटकाचे प्रणेते मायकल मधुसूदन दत्त यांचे १८७३ मध्ये निधन झाले.

  • प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे १९६६ मध्ये निधन झाले.

  • कथा-कादंबरी लेखक दि.बा. मोकाशी यांचे १९८१ मध्ये निधन झाले. त्यांनी गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा यांसारख्या वेगळ्या वळणाच्या कथाही लिहिल्या.

  • चिमणराव-गुंड्याभाऊ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक आणि अभिनेते विष्णुपंत जोग यांचे १९९३ मध्ये निधन झाले.

  • कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे २००० मध्ये निधन झाले. त्यांनी ब्रिटिश वायुदलातून कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैनिकी कारकिर्दीस आरंभ केला होता.

  • मराठी भाषिक लेखक, विचारवंत वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे २०१० मध्ये निधन झाले.

Uddhav Thackeray : 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला

Loksabha Election 2024 : देशभरातील 12 राज्यांतील 94 जागांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, आज आणि उद्या समुद्रकिणारी जाणं टाळावं, धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय