लोकशाही स्पेशल

आज काय घडले : चंद्रशेखर आझाद यांनी सरकरी खजिना लुटला

Published by : Team Lokshahi

सुविचार

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

आज ‘ऑगस्ट क्रांती दिन’ : क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतीदिन म्हणून आज ‘ऑगस्ट क्रांती दिन’ साजरा केला जातो.

आज जागतिक आदिवासी दिन : संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने दरवर्षी ९ ऑगस्ट हा ‘विश्व मूलनिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशातही याला आदिवासी दिन म्हणून साजरे केले जाते.

आज काय घडले

  • १९२५ मध्ये चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला. क्रांतीकारकांसाठी शस्त्र घेण्यासाठी ही लूट करण्यात आली.

  • १९४५ मध्ये जपानच्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेने ६ ऑगस्ट रोजी अणुबॉम्ब टाकला. त्यानंतर तीनच दिवसांनी ९ ऑगस्ट रोजी नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकला. त्यातही जवळपास ९० हजार व्यक्ती काही क्षणांत ठार झाल्यात.

  • १९६५ मध्ये मलेशिया राष्ट्रातून बाहेर काढल्या गेल्यामुळे सिंगापूर देशाला स्वातंत्र्य मिळालं. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.

  • १९७४ मध्ये अमेरिकेतील गाजलेल्या वॉटरगेट प्रकरणात महाभियोग चालवला जाण्याची चिन्हे दिसल्यावर राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पदाचा राजीनामा देणारा ते अमेरिकी इतिहासातला एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत.

आज यांचा जन्म

  • मराठी नाट्यसृष्टीतील श्रेष्ठ गायक व अभिनेते केशवराव भोसले यांचा १८९० मध्ये जन्म झाला.

  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मरयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा १९०९ मध्ये जन्म झाला.

  • भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू यांचा १९७५ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • मराठी रंगभूमीचे जनक, मराठी नाटककार व “महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनी” म्हणून प्रसिद्ध असणारे विष्णुदास अमृत भावे यांचे १९०१ मध्ये निधन झाले.

  • नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक हर्मान हेस यांचा १९६२ मध्ये निधन झाले.

  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचे २००२ मध्ये निधन झाले.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "राजकारणातून..."

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून PM मोदींचा 'मातोश्री'वर निशाणा; म्हणाले, आज बाळासाहेब असते, तर..."

उद्गीरमध्ये प्रियांका गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या; "पैशांच्या जोरावर महाराष्ट्रातील आमदारांना..."

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून कांदा निर्यातीला अखेर परवानगी