Admin
Admin
लोकशाही स्पेशल

होळी, धूलिवंदन, रंगपंचमी यातील फरक तुम्हाला माहितीय का? वाचा सविस्तर

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्र हा संस्कृती, प्रथा, परंपरा आणि विविधतेने नटलेला आहे. होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी यातील फरक आपल्याला माहिती आहे का?

खरंतर महाराष्ट्रातील प्रत्येक भागात तेथील स्थानिक प्रथे-परंपरेनुसार होळी साजरी केली जाते. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा रंगोत्सव साजरा केला जातो. कोकणात तर या उत्सवाला शिमगा असं म्हणतात. कोकणातील शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसासाठी अतिशय महत्वाचा सण. मुंबईत आणि बऱ्याच ठिकाणी होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळले जातात. मात्र रंग खेळण्याचा दिवस हा होळीनंतर पाचव्या दिवशीच असतो त्याला रंगपंचमी असं संबोधले जाते.

महाराष्ट्रातील आदिवासी भागात तेथील प्रथेपरंपरेनुसार होळीचा सण साजरा केला जातो तर महाराष्ट्रतील बंजारा समाजही त्यांच्या चालीरुढी जपत हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या सणाला पुरण पोळी बनवली जाते आणि त्याचा नैवद्य होळीला दाखवला जातो.

होळी, धूलिवंदन, रंगपंचमी यातील फरक तुम्हाला माहितीय का?

होळीच्या दिवशी होळी पेटूवून तिची पूजा करून पेटवली जाते. यादिवशी होळीला पुरण पोळीचा नैवद्य दाखवला जातो. होळी रचण्याची धामधूम 3 ते 4 दिवस आधीच सुरु असते.

तर धूलिवंदन म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाणारी होळीची कर. या दिवशी होळी जाळून उरलेली राख एकमेकांवर उधळली जाते आणि यासोबत संध्याकाळी गावातील प्रमुख भागात विविध वेशभूषा करून मुले, तरुण जमतात आणि त्यांची मिरवणूक काढली जाते त्याला वीराचा पाडवा असं म्हणतात.

आणि रंगपंचमी म्हणजे होळी नंतर पाचव्या दिवशी साजरा केला जाणारा सण. यादिवशी सामाजिक सलोखा जपत एकमेकांवर विविध रंगांची उधळण केली जाते. सर्वत्र कोरडे रंग, ओले रंग आणि पाणी देखील खेळले जाते या दिवशी होळीच्या सणाची सांगता होते.

मात्र महाराष्ट्र प्रत्येक भागात तेथील परंपरे नुसार होळीचा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी 5 तर काही ठिकाणी 7 दिवसांचा हा सण उत्साहात साजरा केला जातो.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा