Friendship Day 2022
Friendship Day 2022  Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

Friendship Day 2022 : फ्रेंडशिप डे का साजरा करतात, त्याची सुरुवात कशी झाली? या दिवसाचा इतिहास जाणून घ्या

Published by : shweta walge

फ्रेंडशिप डे जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. बहुतेक देशांमध्ये, 30 जुलैलाच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. भारत, बांगलादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यासारखे काही देश ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात. फ्रेंडशिप डे सेलिब्रेशनची तयारी सुरूअसताना, त्यामागची कहाणी काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो?

Friendship Day कधी सुरू झाली?

फ्रेंडशिप डे संदर्भात अनेक प्रकारच्या कथा ट्रेंडमध्ये आहेत. फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात पॅराग्वेपासून झाल्याचे सांगितले जाते. यातील एका कथेनुसार, जागतिक मैत्री दिनाची कल्पना सर्वप्रथम 1958 साली डॉ. रेमन आर्टेमियो ब्राचो यांना आली. त्याने ही कल्पना त्याच्या मित्रांसोबत शेअर केली. यानंतर मित्रांनी वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड असे नाव दिले आणि अशी सुरुवात झाली.1958 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव आणला गेला. यानंतर संयुक्त राष्ट्राने 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.

फ्रेंडशिप डे बद्दलची दुसरी कथा देखील खूप प्रसिद्ध आहे. 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकेत एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती, असे म्हटले जाते. खून झालेल्या व्यक्तीचा एक खास मित्र होता, जेव्हा त्याला ही घटना कळली तेव्हा तो खूप दुःखी झाला आणि त्याला धक्का बसला आणि त्याने आत्महत्या केली. दोन मित्रांमधील अशी जोड पाहून अमेरिकन सरकारने ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू हा दिवस प्रचलित झाला.

यानंतर भारतासह इतर देशांमध्ये ऑगस्टचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात आला. दोन मित्रांमधील अशी जोड पाहून अमेरिकन सरकारने ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू हा दिवस प्रचलित झाला. यानंतर भारतासह इतर देशांमध्ये ऑगस्टचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात आला.

युनायटेड नेशन्समध्ये जगभरातील लोकांनी तो साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा फ्रेंडशिप डेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. त्याच वेळी, 27 एप्रिल 2011 रोजी, संयुक्त राष्ट्रांनी दरवर्षी 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस साजरा करण्याची घोषणा केली.

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल