Admin
Admin
लोकशाही स्पेशल

आज दिवाळी पाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक, काय आहे शुभ मुहूर्त

Published by : Siddhi Naringrekar

आज दिवाळी पाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो. दिवाळीची सुरुवात झाल्यावर लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो. मात्र यंदाच्या वर्षी भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी आहे आहेत.

या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते. यादिवशी पतीने पत्नीला ओवाळणी म्हणून सोने, साडी किंवा एखादी मोठी भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. दिवाळी पाडव्याच्याच दिवशी बलिप्रतिपदा पूजेला देखील विशेष महत्त्व आहे. बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तीन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे.

आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता इत्यादी वाहून त्यांची पूजा होते.

शुभ मुहूर्त

सकाळी सूर्योदयापासून स. ९.३० पर्यंत

तसेच १०.५६ ते दु १२.२२ मिनिटांपर्यंत.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा