Admin
Admin
लोकशाही स्पेशल

Vat Purnima 2023: वटपौर्णिमेचे व्रत; जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि योग्य विधी

Published by : Siddhi Naringrekar

Vat Savitri Purnima pooja vidhi : ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत करतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते, असे सांगितले जाते.

जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर व्रताची सुरुवात करावी. या दिवशी श्रृंगार करावा. त्यानंतर वट वृक्षाची पूजा करावी. वडाला फुले, वाण, पाणी देत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. झाडाभोवती कच्चे सूट गुंडाळून परिक्रमा कराव्या. या दिवशी सत्यवान सावित्रीची कथा ऐकावी.

नववधूंमध्ये वटपौर्णिमा या सणाचा विशेष उत्साह पाहायला मिळणार आहे. वट पौर्णिमेच्या दिवशी महिला साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करायला जातात. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य जीवनामध्ये सुख आणि संपत्ती प्राप्त होते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे, यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते.

वट सावित्री पौर्णिमा 2023

पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेची तिथी 3 जून 2023 सकाळी 11.16 वाजता सुरु होणार आहे. तर दुसऱ्यादिवशी 4 जून 2023 रविवारी सकाळी 09.11 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार वटपौर्णिमेचा सण शनिवारी साजरा करायचा आहे.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "राजकारणातून..."

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून PM मोदींचा 'मातोश्री'वर निशाणा; म्हणाले, आज बाळासाहेब असते, तर..."

उद्गीरमध्ये प्रियांका गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या; "पैशांच्या जोरावर महाराष्ट्रातील आमदारांना..."

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून कांदा निर्यातीला अखेर परवानगी