लोकशाही स्पेशल

दिवाळीत फराळ करताना ‘या’ टिप्सचा वापर करुन सांभाळू शकता आरोग्य

Published by : shweta walge

दिवाळी जवळ आली आहे. कोरोनाच्या तब्बल दोन वर्षांनंतर दिवाळी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त देशभरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी सुद्धा लगबग सुरु झाली आहे. त्याचबरोबर दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्याच घरात फराळ करण्याची लगबग सुरु होते, चकली, चिवडा, करंजी, लाड, शंकरपाळ्या, अनारसे आणि इतर गोड पदार्थ घरात बनवले जातात. हे सर्व पदार्थ तोंडाला पाणी सुटायला लावणारे असले तरी दिवसाळीच्या दिवसात काही गोष्टींचे पालन करुन आरोग्यदायी राहू शकता.

दिवसाळीच्या दिवसात या गोष्टींचे पालन करणे ठरेल आरोग्यदायी

  • दिवसाळीचा फराळ बनविताना साखरेचा आणि तेलाचा वापर कमी करा.

  • दिवाळीत रोआजच्या जेवणातला आहार चौरस असायला हवा. जेवणाला पर्याय म्हणून फराळ करू नका. एखाद वेळी जेवणात एक पोळी किंवा भात कमी करुन तुमच्या आवडीचा पदार्थ खाऊ शकता.

  • दिवाळीत तेलापासून बनविलेले पदार्थ आणि थंडी यामुळे शरीरात कमी प्रमाणात पाणी जाते पण त्यामुळे अपचन, बद्धकोष्ठ होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाणी प्या.

  • नियमित व्यायाम करा

बीएमसी घाटकोपरमधील होर्डिंगवर कारवाई करणार

पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

इंडिया आघाडीची 'या' दिवशी होणार मुंबईत प्रचारसभा

अमरावती महानगरपालिकाचे कर्मचारी आजपासून संपावर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...