Pune Ganpati Visarjan 
पुणे

Pune Ganpati Visarjan : यंदा पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक एक तास आधी; विसर्जन मिरवणुकांच्या नवीन नियमांसाठी मंडळाची सहमती

पुणे शहरात यंदाची विसर्जन मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

Published by : Team Lokshahi

(Pune Ganpati Visarjan) पुणे शहरात यंदाची विसर्जन मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. यंदा मिरवणुकीची सुरुवात नेहमीपेक्षा एक तास आधी, म्हणजे शनिवारी (दि. 6) सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. मागील वर्षी ही मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. यावेळी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. मानाच्या मंडळांनी देखील या नियोजनास सहमती दर्शवली असून वेळेत विसर्जन होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

मानाचा पहिला कसबा गणपती सकाळी 9.30 वाजता टिळक पुतळा, मंडई येथे आगमन करून बेलबाग चौकाकडे मार्गस्थ होईल. त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी 10.30 वाजता, मानाचा तिसरा गुरुजी तालिम गणपती 11 वाजता, तर मानाचे चौथा तुळशीबाग व पाचवा केसरीवाडा गणपती दुपारी 12 वाजेपर्यंत बेलबाग चौक पार करून पुढे जातील. अशा प्रकारे दुपारपर्यंत सर्व मानाचे गणपती लक्ष्मी रोडवर मार्गस्थ होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

मिरवणुकीत विद्युत रोषणाईची मंडळे सायंकाळी सात वाजल्यानंतर सहभागी होतील. यावेळी लक्ष्मी रोड व शिवाजी रोडवरून येणाऱ्या मंडळांना फक्त बेलबाग चौकातूनच प्रवेश दिला जाईल. विशेष म्हणजे कसबा गणपती अलका टॉकीज चौक पार करेपर्यंत कोणतेही इतर मंडळ त्या चौकात प्रवेश करणार नाही. यामुळे मिरवणूक शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पार पडेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलिसांनी काही अटीसुद्धा घालून दिल्या आहेत. टिळक पुतळा ते बेलबाग चौक या दरम्यान वाद्यवृंद वादनास मनाई असून वादनाची सुरुवात बेलबाग चौकातूनच करता येईल. तसेच दोन मंडळांमध्ये अंतर न ठेवणे, कोणीही रांग सोडून प्रवेश न करणे, स्थिर वादन न करणे अशा सूचनादेखील दिल्या आहेत. प्रत्येक मंडळास दोनच ढोल-ताशा पथकांची परवानगी असून एका पथकात जास्तीत जास्त 60 सदस्य राहतील.

याशिवाय डीजे किंवा ढोल-ताशा पथक यापैकी फक्त एकाच गोष्टीचा वापर प्रत्येक मंडळ करू शकेल. ढोल-ताशा पथक सदस्यांनी मिरवणूक संपल्यानंतर परतीचा मार्ग उलट दिशेने घेऊ नये, असेही आदेश दिले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उद्धव ठाकरेंनी घेतली विदर्भ, मराठवाडा जिल्हाप्रमुखांची बैठक…

Mumbai Police : महाराष्ट्र पोलीस भरतीत मोठी संधी!, वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही पोलीस भरतीत अर्जाची परवानगी

Bigg Boss Season 19 : नेहल चुडासमाचे अमाल मलिकवर गंभीर आरोप; बिग बॉस 19 मध्ये वादाची लाट

ITR FILING : आता दिवस उरले 3, आयटीआर भरायला उशिरा झाला भरल्यास काय होते जाणून घ्या...