अनिल घोडविंदे, शहापूर | शहापूर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे तानसा धरणाचे 38 दरवाजे उघडले तर वैतरणा मोडकसागर धरणाचे 2 दरवाजे उघडल्याने नजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहापूर तालुक्यात गेल्या पाच दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून वैतरणा नदीवरील मोडकसागर धरणाचे दोन दरवाजे 5 फुटाने उघडण्यात आले आहेत. या दरवाजातून 20977 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर वैतरणा नदी काठावरील वाडा व पालघर तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तानसा धरणाचे संपूर्ण 38 दरवाजे उघडले असून तानसा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या भिवंडी व वसई तालुक्यातील गावांना ही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.