महाराष्ट्र

ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांची कारवाई; 96 जण ताब्यात

नववर्षाच्या पुर्वसंध्येला ठाण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथे एक रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

ठाणे : नववर्षाच्या पुर्वसंध्येला ठाण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथे एक रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये पोलिसांनी धाड टाकून सुमारे 96 तरुणांना ताब्यात घेतले आहे. पार्टीतील गांजा, चरस यासारखी अंमली पदार्थ जप्त करण्यात आली आहेत.

माहितीनुसार, ठाणे शहरापासून काही अंतरावर असलेल्या वडवली गावातील जंगलात रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. ३१ डिसेंबरच्या आदल्या रात्रीच रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावर ठाणे पोलिसांनी छापा टाकत ९६ तरुणांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांची वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या पार्टीदरम्यान गांजा आणि २६ एलएसडी डॉट पोलिसांनी जप्त केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?