महाराष्ट्र

पुणे हादरलं! 17 वर्षीय मुलीवर आरपीएफ जवानाने केला बलात्कार

पुण्यातील धक्कादायक घटना समोर; पाच दिवस डांबून पीडितेवर आरपीएफ जवानाने बलात्कार केल्याचे उघडकीस

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. 17 वर्षीय मुलीला 5 दिवस डांबून आरपीएफ जवानाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरपीएफ जवान अनिल पवार आणि सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटी संस्थेचा कर्मचारी कमलेश तिवारी अशी आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीही ही दहावीत शिकायला असून छत्तीसगड राज्यात कुटुंबासह वास्तव्यास आहे. लीलाधर ठाकूर नावाच्या मित्राने तिला 'माझे तुझ्यावर खूप प्रेम असून आपण पुण्याला जाऊन लग्न करू' अशी बतावणी केली. १२ सप्टेंबर रोजी ते पुणे रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यावेळी तीन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या आणि तेथून त्यांना पोलिसांकडे नेले. तेथे पोलीस गणवेशात अनिल पवार हा कर्मचारी होता. पोलीस कर्मचारी अनिल पवार याने पीडित मुलगी व ठाकूर यांना बराच वेळ बसवून ठेवले.

त्यानंतर रेल्वे कॉलनीतील एका खोलीत पीडित मुलीला व ठाकुर यास बंद करून ठेवले आणि पैशांची मागणी केली. त्यानंतर तिला वेगळ्या खोलीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी कमलेश तिवारी याने त्या मुलीला काम करण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ठाकूरला या दोघांनी सोडून दिले. मात्र, पवार व तिवारी जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिच्यावर बलात्कार करीत होते.

दरम्यान, पीडित तरुणीचे वडील छत्तीसगड पोलिसांसह पुण्यात आले आणि मुलीची सुटका केली. तिला परत घेऊन गेल्यावर तिने छत्तीसगड पोलिसांना आपबिती सांगितली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य