Crime
Crime Team Lokshahi
महाराष्ट्र

धक्कादायक! उस्मानपुरा परिसरात एक कुत्र्याला माथेफिरूने चाकूने भोसकून केले ठार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सचिन बडे | छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा परिसरात रस्त्याच्या कडेला शांतपणे उभा असलेल्या एका श्वानाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा संतापजनक प्रकार मंगळवारी रात्री १ वाजता घडल्याची माहिती आहे.

हल्ली भटक्या श्वानास दगड मारणे, हाकलून देणे असे प्रकार वाढले आहेत. अन्नाच्या शोधात श्वान रस्त्यावर भटकताना अनेक भागांत दिसून येतात. फार कमीवेळा असे श्वान स्वत:हून हल्ला केल्याचा प्रकार शहरात घडले आहेत. मात्र, रस्त्याच्या कडेला उभा श्वानावर एका माथेफिरूने धारदार चाकूने हल्ला केला. अत्यंत निर्घृणपणे माथेफिरू श्वानाची हत्या करतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दुसऱ्या दिवशी श्वान रस्त्याच्या कडेस मृत आढळून आल्याने पेट लव्हर्समधून संताप व्यक्त करण्यात आला.

अगदी शांत डोक्याने या युवकाने श्वानावर चाकूचे वार करून ठार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या माथेफिरू युवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उस्मानपुरा भागातील प्राणीमित्रांनी केली आहे.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा