महाराष्ट्र

Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरण: पोलिसांनी 2 जणांना घेतलं ताब्यात

ठाकरे गटाचे दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस याने स्वत:ला देखील गोळ्या झाडल्या. मॉरिसने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं.

अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं संपवून उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनंही स्वतःवर गोळी झाडून घेतल्या. या प्रकरणात आता 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रोहित साहू आणि मेहूल पारेख अशी त्यांची नावं आहेत.

अभिषेक घोसाळकर यांचा मृतदेह जे जे रुग्णालयात काल रात्री शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. आज सकाळी 5.45 वाजता त्यांचं शव त्यांच्या निवास्थानाकडे घेऊन गेले. आज अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray Dasara Melava : आवाज ठाकरेंचाच… शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी

Nepal Violence : नेपाळच्या राजकीय उलथापालथीनंतर पंतप्रधान मोदींची पाहिली प्रतिक्रिया म्हणाले की,...

Latest Marathi News Update live : उद्धव ठाकरेंना मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर परवानगी

Delhi News : नव्या कारची पुजा पडली महागात! काही घडलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का