Asaduddin Owaisi Team Lokshahi
महाराष्ट्र

Asaduddin Owaisi : भारत कोणाचापासून पवार-मोदी युतीसह ओवैसीच्या भाषणातील हे आहेत महत्वाचे मुद्दे

भिवंडीतील खालीद गुड्डूला सोडा, नाहीतर...

Published by : Team Lokshahi

मुंबई :

भिवंडीमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची सभा (Asaduddin Owaisi Sabha in Bhiwandi) यांची सभा झाली. ओवैसी यांनी आपल्या भाषणात भारताचे मुळ रहिवाशी कोण, ज्ञानवापी, ताजमहलवरून आक्रमक भाषण केले. ओवैसीचे भाषणातील मुख्य मुद्दे...

१) खालीद गुड्डूला सोडा, नाहीतर...

भिवंडीतील खालिद गुड्डू यांना राज्य सरकारने विनाकारण कारागृहात टाकले आहे. त्याच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. आता केंद्र सरकार शिवसेनेच्या नेत्यांवर करत असलेल्या कारवाईमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. यामुळे ठाकरे यांनी खालिद गुड्डूचा विचार केला पाहिजे. लोकशाहीचा आदर करत त्याला सोडाले पाहिजे.

२) यामुळे नवाब मलिकांना अटकवले

आम्ही नवाब मलिकसंदर्भात बोलणार नाही. कारण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना वाटते की, आम्हाला कोणाला कारागृहात टाकू नका. परंतु आमच्या पक्षातील मुस्लिम नेत्यांना टाका, अशी त्यांची वृत्ती आहे. शरद पवार संजय राऊत यांच्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शब्द टाकतात. परंतु ते नवाब मलिक यांच्यांसाठी बोलत नाही. म्हणजेच पवारांसाठी नवाव मलिका पेक्षा संजय राऊत मोठे आहे की नाही.

३) मोदींवर महागाईवरुन टीकास्त्र

देशात आतापर्यंत सर्वोच्च महागाई दर आहे. परंतु दुसरीकडे भाजप सरकार आठ वर्ष पुर्ण झाल्याचा जल्लोष साजरा करत आहे. देशात असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. याला जबाबदार कोण आहे? यावर कोणी बोलत नाही. देशातील पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्यास आता औरंगजेबला जबाबदार धरतील.

४) भारत द्रविडींचा आहे...

देशात ६५ हजार वर्षांपुर्वी आफ्रिकातून लोक आले होते. त्यानंतर ४५ हजार वर्षांपुर्वी इराणवरुन शेतकरी आले. त्यानंतर आर्य आले. त्यांना आर्यंन बनले. यामुळे भारत द्रविडींचा आणि आदिवासींचा आहे. यामुळे मुघलांनी भारतावर राज्य केले, हे पुर्ण खरे नाही. खरे तर द्रविडी आणि आदिवासी येथील आहे. तुम्ही ७०० वर्षांचा इतिहास काढला तर मी ६५ हजार वर्षांचा इतिहास सांगत आहे.

५)जग्गनाथ मंदिराच्या ठिकाणी काय होते...

बाबा आदाम यांची आम्ही वशंज आहोत. त्यामुळे ही जमीन आमच्या बापाची आहे. अशोकाचा नातूला कोणी मारले?याच व्यक्तीने ४० हजार बुद्धीस्थांना मारले. यावर संघ परिवार बोलणार नाही. कोणतीही गोष्ट ते मोघलांवर आणतात. जग्गनाथ मंदिर बुद्धस्थांचे होते. त्या ठिकाणी मंदिर बांधले गेले, हे स्वामी विवेकानंद यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे? हे खोटे आहे का?

६) भाजप मुस्लिमविरोधात

भाजप मुस्लिम विरोधात आहे. देशात हिजाब, मशिद, गोस, आजन यावर विषय सुरु आहे. मुस्लिमांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुस्लिमांमध्ये डर निर्माण करण्याचा सातत्यांने प्रयत्न सुरु आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा