महाराष्ट्र

अशोक चव्हाण यांचा ईगतपुरी दौरा; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी बुजविले खड्डे

Published by : Lokshahi News

विकास काजळे, इगतपुरी | सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उद्या शुक्रवारी ईगतपुरी दौऱ्यावर येणार आहेत. या संदर्भातील माहिती शहरातील पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना मिळताच अधिकारी कामाला लागले असून रस्त्यातील खड्डे बुजविण्यास सुरूवात झाली आहे.या घटनेनंतर आता सार्वजनिक बांधकाम खात फक्त मंत्र्यांसाठी आहे का ? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

अशोक चव्हाण उद्या शुक्रवारी ईगतपुरी दौऱ्यावर येणार आहेत. तत्पुर्वी उद्या शुक्रवारच्या त्यांच्या दौऱ्यात त्यांची रस्त्यातील खड्ड्यांअभावी त्यांची कुठलीही गैरसोय अथवा प्रवासात त्रास होऊ नये यासाठी शहरातील पीडब्ल्यूडी अधिकारी खडबडून जागे झाले असून खड्डे बुजविण्याच्या कामास लागले आहेत. मागील अनेक दिवसांपासून नॉट रीचेबाल असलेले पीडब्ल्यूडी अधिकारी रीचेबल झाले आणि इगतपुरीच्या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचां केविलवाणा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. अशावेळी स्थानिकांच्या रोषाला देखील त्यांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात फक्त मंत्र्यांसाठी आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

कोकणात 1 जूनपासून मासेमारीवर बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास मच्छीमारांवर कडक कारवाई

IPL 2024 : हैदराबाद आणि गुजरातचा सामना रद्द; काय आहे प्ले ऑफचं समीकरण? 'हा' संघ मारणार बाजी

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे