Chandrasekhar Bavankule
Chandrasekhar Bavankule  team lokshahi
महाराष्ट्र

देहूतील कार्यक्रमात अजित पवारांना का बोलू दिलं नाही?, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

Published by : Shweta Chavan-Zagade

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काल (14 मे) मुंबई आणि पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी देहू येथील तुकोबारायांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण केलं. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis ) यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. दरम्यान यावेळी व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीस यांच्यासह नरेंद्र मोदींनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केलं. पण अजित पवारांना व्यासपीठावरून भाषण संधी दिली गेली नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

अजित पवार यांना व्यासपीठावरून बोलू न देणे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही हा मुद्दा उपस्थित करत नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मात्र यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहेत.

नरेंद्र मोदींसोबत लोकार्पण कार्यक्रमासाठी व्यासपीठावरही अजित पवार उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनोगत व्यक्त केले. मात्र, अजित पवार यांना बोलण्याचा मान दिला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली.

यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले, देहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा कोणताही अपमान झालेला नाही. तर अजितदादा पवार यांचे भाजप सोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहे. ते कुणाच्या तरी पोटात दुखतंय म्हणून अजितदादा यांचा अपमान झाला अस चित्र तयार करण्यात आलेल आहे, असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला प्रोटोकॉल समजला का?. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री बोलले नाहीत. तो आठवावा शपथविधी....! असं खोचक ट्विट सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. तसेच, आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना मेन्शनही केलं आहे.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा