थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP ) महापालिका निवडणुकांच्या मतदानानंतर काल मतमोजणी पार पडली. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.
मुंबई महानगर पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता आल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाकरे-पवार आणि काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. भाजपने जवळपास ९ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली. २९ पैकी ९ महापालिका भाजपने स्वबळावर जिंकल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
Summary
महापालिकांमध्ये भाजपची सरशी
२९ पैकी ९ महापालिका भाजपने स्वबळावर जिंकल्या
महापालिकांवर झेंडा फडकवत फडणवीसांकडून 'ब्रँड देवेंद्र'चा करिश्मा सिद्ध