महाराष्ट्र

धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करा, अतुल भातखळकरांची निवडणूक आयुक्तांकडे मागणी

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे या आरोपाचे खंडन केले. बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांची बहीण करुणा यांच्याबरोबर परस्पर संमतीने संबंध होते आणि त्यातून दोन मुले जन्मल्याचे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले. त्यांच्या या कबुलीमुळे मुंडे यांची आमदारकी धोक्यात येणार का, असा प्रश्न निर्माण होत असतानाचं, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी भाजप आमदार अतुल भातखकर यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

धनंजय मुंडे यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत करुणा शर्मा यांच्यासोबतच्या संबंधांची कबुली दिली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, करुणा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे, असं मुंडेंनी म्हटलं आहे. मात्र यामध्ये सदर महिलेच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च , निवास्थानाचा खर्च, एलआयसी खर्चचे कागदपत्रे दाखवण्यात आले नाही.

आता करुणापासून झालेली दोन मुले आणि कायदेशीर पत्नीपासून झालेल्या 3 मुली अशी पाच मुले असल्यानं मुंडे कायदेशीररित्या अडचणीत येऊ शकतात. धनंजय मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर केलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोचा आणि तीन मुलींचा उल्लेख केला आहे. दुसऱ्या महिलेची माहिती दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत.

शिवसेनेवरही निशाणा
धनंजय मुंडे प्रकरणावरून अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात सातत्याने मोदी सरकारवर टीका केली जाते. याच मु्द्द्यावरून, 'मुंडे, मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा की. जोरदार समर्थन करा आणि यात केंद्र सरकार कसे दोषी आहे हेही सांगा. लोक आतुरतेने वाट पाहतायत,' असा टोला भातखळकरांनी लगावला आहे.

कायदा काय सांगतो?

  • 2001 च्या अपत्याच्या कायद्यानुसार दोन अपत्यांमध्ये तिसऱ्या मुलाची भर पडल्यास तो कायद्याने गुन्हा आहे.
  • अशी व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते.
  • मुंडे यांनी दुसऱ्या महिलेपासून झालेल्या दोन मुलांची माहिती लपवली आहे.
  • ही मुले 2001 नंतर जन्मलेली असतील तर मुंडे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.
  • शिवाय निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणं गुन्हा आहे.

एकीकडे धनंजय मुंडेंना कायदेशीर बाबींचा सामना करावा लागू शकतो तर दुसरीकडे पोलीस चौकशीची टांगती तलवार मुंडेंवर आहे. पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवला नाही. मात्र प्राथमिक चौकशी पोलीस करू शकतात. 2006 खाली बलात्कार झाल्याचा आरोप पीडितेने धनंजय मुंडे यांच्यावर केलाय. त्यामुळे या जुन्या प्रकरणात लगेच गुन्हा दाखल होईल असं नाही. पण तक्रार दिल्यामुळे प्राथमिक चौकशी होऊ शकते. त्यामुळे येत्या काळात मुंडेंची राजकीय अडचण होणार हे नक्की आहे.

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल