महाराष्ट्र

Corona Positive | उपमुख्यमंत्र्यांनंतर छगन भुजबळांना कोरोनाची लागण

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना कोरोनाची लागण (Corona positive) झाली आहे. यासंदर्भात भुजबळ यांनी पोस्ट शेअर केली आहे.

त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.'

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची मालिका सुरूच आहे. यापूर्वी देखील राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, भगतसिंह कोश्यारी यांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. तसेच बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

IPL 2024 Play Offs : प्ले ऑफचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती