छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं भव्यदिव्य मंदिर भिवंडीत उभारण्यात आलं आहे. भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाडा या ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे.
या शुभ मुहूर्तावर भव्य मंदिरांचा लोकार्पण सोहळा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत.
56 फूट उंचीचं भव्य मंदिर असून मंदिराला 36 फूट उंचीचं महाद्वार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती अयोध्यातील श्री रामाची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे. गाभारा सभामंडप 2500 चौरस फूट क्षेत्राचा आहे. मंदिराभोवती 4 बुरूज आहेत.