महाराष्ट्र

Nala Sopara Viral Video : दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी

नालासोपाऱ्यात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून, हाणामारीत एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Published by : shweta walge

नालासोपाऱ्यातील एक घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून दोन गटात चाकूने तुफान हाणामारी झाली आहे.यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही गटाविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर दोन गंभीर जखमी हे मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

संतोष भवनच्या कारगिल येथील सार्वजनिक बाथरूमच्या समोरील रोडवर जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून दोन गटात शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास चाकूने तुफान हाणामारी झाली आहे. आरोपी रफिक, सलीम आणि त्यांच्या चार साथीदारांनी चाकूने वार करून दिपू उर्फ दीपक पाल याला जीवे ठार मारले. तर आकाश पाल आणि शुभम ठाकूर यांच्यावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत गंभीर जखमी केले आहे. दोघांना शताब्दी रुग्णालयात भर्ती केले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका मुलावरून दोन्ही गटात दोन ते तीन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याच मागील भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री चाकूने हाणामारी झाली आहे. पोलीस अंमलदार प्रमोद निवळे (३२) यांनी तक्रार देऊन हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसऱ्या गटातील सलीमवर चाकूने वार झाले असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. याप्रकरणीही पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा