महाराष्ट्र

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे आज पंतप्रधान मोदींना भेटणार, या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यात सत्तांतर झाल्यानतंर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) दिल्लीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah, Cabinet) भेट घेतली. ही बैठक मध्यरात्री दोनपर्यंत सुरु होती आणि या भेटीत राज्यमंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Expansion) आणि कायदेशीर लढ्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच कायदेशीर लढ्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठकीत देखील या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. दोघांनाही शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करतील आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास आहे, असे अमित शाह यांनी या भेटीचे फोटो ट्वीट करत म्हणाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.

मुख्यमंत्री दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान मोदी यांच्यासह देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील. पुण्याहून मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार आहेत. तिथे उद्या आषाढी एकादशीनिमित्त त्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त विठ्ठलाची पूजा होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीतून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर पोहचतील असं सांगण्यात आलं आहे. पुणे विमानतळावरून ते आषाढी एकादशीनिमित्त करण्यात येणाऱ्या शासकीय पुजेसाठी पंढरपूरला रवाना होतील, अशी माहिती मिळत आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...