महाराष्ट्र

Petrol Diesel चे दर झाले कमी; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारकडून पेट्रोलवर प्रतिलीटर 5 रूपयांची कर कपात तर डिझेलवर प्रतिलीटर 3 रुपयांची करकपात करण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

देशात मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे (petrol-diesel price ) दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सरकारने केली नव्हती. मात्र आता राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट (petrol, diesel rates vat) कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीच्या दिवशीच इंधनदर कपात करणाऱ्या असल्याची घोषणा केली होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने पेट्रोल डिझेल VAT कमी केला आहे. त्यामुळे आता पेट्रोल प्रती लिटर पाच रुपये डिझेल प्रतीलिटर तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेतील विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेल दर आणखी कमी करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करावा अशी मागणी सातत्याने त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपकडून करण्यात येत होती. मात्र, त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने व्हॅट कमी करण्यास नकार दिला. त्याऐवजी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर वाढवलेल्या करात कपात करावी अशी मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारने राज्याचा जीएसटी परतावाही दिला नसल्याचा मुद्दा महाविकास आघाडीकडून अधोरेखित करण्यात आला होता.

शिंदे-फडणवीस सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला आणि मालवाहतूकदारांनाही दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा