लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. लाडक्या बहिणींचे दरमहा 1500 रुपये अनुदान बँकेत जमा होते. ज्या बहिणींना उद्याोग सुरू करायचा असेल तर अशा महिलांना या योजनेच्या हमीवर लघु उद्याोगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
काही बँकांसोबत चर्चा सुरू असून लाडक्या बहिणींचं दरमहा अनुदान जमा होतं, त्या बँकेतून त्यांना व्यवसायासाठी 30 ते 40 हजार रुपये कर्जासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली. त्याचबरोबर कर्ज दिल्यास संबंधित बँकेचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अनुदानाच्या रकमेतून वळवण्यात येणार असल्याचंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केल आहे.