डहाणूला डाउन लाईनची ओव्हरहेड वायर तुटल्याने आज वाणगाव ते डहाणू दरम्यान संध्याकाळ पर्यंत लोकल रद्द केल्या आहेत. या लोकल केळवेरोड, पालघर, बोईसर किंवा वाणगाव येथून सोडण्यात येणार आहेत. बोईसर- दिवा ही गाडी आज रद्द केली आहे.
उमरोळी स्थानकात कुठलीही पॅसेंजर थांबत नसल्याने, आज झालेल्या तांत्रिक बिघडामुळे उमरोळी स्थानकात वलसाड गाडीचा थांबा द्यावा ही विनंती केली होती ती मान्य झाली आहे. सध्याही दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर सुरू असून, लोकल 40 ते 45 मिनिटे उशिराने धावत आहेत तर याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही आहे.