महाराष्ट्र

Jalna : माहेरी गेलेल्या बायकोला परत आणण्याच्या मागणीसाठी दारूच्या नशेत तरूणाचा मोबाईल टॉवरवर ठिय्या

माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणा, मला घरकुल द्या, या मागणीसाठी एका तरुणाने दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढून 4 तास मुक्काम ठोकला आहे

Published by : Shweta Chavan-Zagade

रवी जैस्वाल | जालना : माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणा, मला घरकुल द्या, या मागणीसाठी एका तरुणाने दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढून 4 तास मुक्काम ठोकला आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे ही घटना घडलीय. गणपत बकाल असं दारू पिऊन मोबाईल टॉवरवर चढणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने 4 तास दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर मुक्काम ठोकल्यानं घटनास्थळी जमा झालेल्या नागरीकांमध्ये घबराट पसरली होती. सर्व यंत्रणांनी प्रयत्न करूनही हा तरुण खाली आला नाही. अखेर स्वतःहून 4 तासानंतर तो टॉवरवरून खाली आल्यानं उपस्थित नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

दारूच्या नशेत गणपत बकाल हा 4 वाजेच्या सुमारास गावातीलच मोबाईल टाॅवरवर चढला. गावातील लोकांना त्याने मला घरकुल पाहिजे. माझी बायको मला सोडुन माहेरी गेलेली आहे, तिला माझ्या कडे परत आणा, अशी मागणी केली. गावकऱ्यांनी त्याला टॉवर वरून खाली उतरण्यासाठी खुप प्रयत्न केले. पोलिसांचा फौजफाटा देखील घटनास्थळी दाखल झाला.

मात्र पोलिसांकडूनही तो खाली आला नाही. त्यानंतर मात्र अग्नीशमन दलाचे पथक मागविण्यात आले मात्र तेही त्याच्यासमोर हतबल झाले.गणपत हा दारूच्या नशेत असल्यानं अनेकांनी त्याची मजा घेतली."तुला आमदार करतो, खाली उतर" अशी गळ घातली पण तरीही तो खाली उतरण्यास तयार झाला नाही.पण तब्बल 4 तासाने तो टॉवर खाली उतरला.त्यांनतर बदनापूर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा