Illegal Mining 
महाराष्ट्र

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील वाळूची तस्करी, महसूल विभाग करतो तरी काय नागरिकांचा सवाल

Illegal Mining: यवतमाळ जिल्ह्यात महसूल विभाग निवडणूक कामांत व्यस्त असल्याने वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून महसूल विभाग निवडणुकीच्या कामांमध्ये गुंतला असल्याने अवैध वाळू उपसा करणारे वाळू माफिया चांगलेच सक्रिय झाले आहेत. जिल्ह्यातील अवैध वाळूचा व्यवसाय करणारी वाहने सुसाट झाली आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाच्या वाळू धोरणामुळे जिल्ह्यात अवैध वाळू माफियांची निवडणुकीच्या काळात चांगलीच चांदी होत आहे.

विशेष म्हणजे मागील काही महिन्यांमध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या गौण खनिजावर कठोर कारवाईचा बडगा उगारला असला, तरी सुद्धा गौण खनिजाचा अवैध काळा धंदा बिनबोभाट सुरूच आहे. प्रत्येक रात्री होत असलेल्या अवैध वाळू तस्करीच्या विरोधात महसूल विभागाची कारवाई ही दुजाभाव करीत काही वाळू वाहतूक वाहनावर मेहरबान तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

  • निवडणूक कामांमुळे महसूल विभागाचे अवैध वाळू तस्करीकडे दुर्लक्ष

  • रात्री वाळूचे अवैध उपसा आणि वाहतूक वाढली

  • काही वाहनांवरच कारवाई होत असल्याची नागरिकांची शंका

  • महसूल मंत्री बावनकुळे यांच्या निर्देशांनंतरही कारवाई अपुरी

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा