(Bacchu Kadu ) बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यांसह 17 वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
बच्चू कडू यांचे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये आंदोलन सुरु असून अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे. बच्चू कडूंनी औषधं घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे मात्र उपचार घेण्यास बच्चू कडूंनी नकार दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील गुरुकुंज मोझरी येथे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देणार आहेत. यासोबतच बच्चू कडू यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी, भारतीय किसान युनियन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, मनोज जरांगे पाटील, राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती मिळत आहे.