जागतिक बाजारात आज सोन्याच्या दारात घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 46518 रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. आज चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर (Silver Price Today) 0.16 टक्क्याने वाढून 68381 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. सोन्याचे दर ऑल टाइम हाय रेट्सच्या स्तरावरून जवळपास 9000 रुपयांनी कमी आहेत. अर्थात तुम्ही साधारण 9000 रुपये स्वस्त दराने सोन्याची खरेदी करू शकता. आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाले तर याठिकाणी देखील सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर कमी होऊन 1,763.63 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. ही गेल्या चार वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 46900 रुपये प्रति तोळा आहे. नवी दिल्लीमध्ये हा दर 50080 रुपये, चेन्नईमध्ये 48100 रुपये, कोलकातामध्ये 49120 रुपये, हैदराबादमध्ये 47730 रुपये आणि जयपूरमध्ये 50080 रुपये प्रति तोळा आहे.