मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केले होते. राज्यभरात अनेक आंदोलनं सुरु होती. काल सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे.
मात्र आता एक वेगळीच चर्चा आहे ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेल्या तारखेवरून मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद झालेला पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. डेडलाईन वरून झालेला घोळ दूर करण्यासाठी होण्याची शक्यता आहे.