अमझद खान | कल्याण : यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवीतील खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याचे विदारक वास्तव, नागरिकांना होनारा त्रास माध्यमांनी दाखवल्यानंतर आता खडबडून जागे झालेल्या केडीएमसीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केलंय. तसेच पालिका क्षेत्रात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग, एम आय डी सीच्या अखत्यारीत काही रस्ते असून या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या आहेत.
याबाबत केडीमसिने पावसामुळे खड्डे बुजवताना अडचणी येत असल्या तरी कोल्ड मिक्स,पेव्हर ब्लॉक, खडीकरण व रेडीमिक्स च्या माध्यमातून खड्डे भरण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत . महापालिकेच्या १० प्रभागासाठी १३ ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली, २४ तास हे काम सुरू असून दर दिवस जवळपास १५०० ते २००० चौ.मी.खड्डे भरण्याचे काम करण्यात येत असल्याचा दावा केला आहे .तर खड्ड्याबाबत तक्रारीसाठी देण्यात आलेल्या टोल फ्री नंबर वर आता पर्यंत २४७ तक्रारी प्राप्त झाल्या असून यामधील सुमारे १५० हून तक्रारीची दखल घेतल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे .
पालिका क्षेत्रातील रस्त्याची झालेली चाळण पाहता या रस्त्यावरून वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे . पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरील खड्डयाबाबत तक्रारीसाठी पालिका प्रशासनाने दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला असून हा क्रमांक नागरिकाच्या हातात पडताच त्रस्त नागरिकांनी तक्रारीचा धडाका लावला आहे. याबाबत केडीएमसीने जुलै महिन्यात आतापर्यंत सतत जोरदार पाऊस सुरू राहिल्याने रस्त्यावरील खड्डयांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे खड्डे भरण्याच्या कामातही अडचणी येत आहेत. परिस्थितीत कोल्ड मिक्स,पेव्हर ब्लॉक, खडीकरण व रेडीमिक्स च्या माध्यमातून खड्डे भरण्याची कामे सुरू ठेवण्यात आली आहेत. महापालिकेच्या १० प्रशासकीय प्रभागासाठी १३ ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली असून दररोज जवळपास १५०० ते २००० चौ.मी.खड्डे भरण्याचे काम करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला.
दरम्यान महापालिका क्षेत्रातील , महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ,महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग, एम आय डी सीच्या अखत्यारीत काही रस्ते असून या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या आहेत.