(Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेस एक वर्ष पूर्ण झाले असून लाभार्थी महिलांना आता जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. जुलै महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.जुलै महिन्याचा ₹1500 चा हप्ता महिलांच्या खात्यात 31 जुलैपर्यंत किंवा उशिरा 5 ऑगस्टपर्यंत जमा होऊ शकतो, अशी शक्यता आहे. यापूर्वी जूनचा हप्ता उशिरा मिळाल्यामुळे महिलांमध्ये जुलै हप्त्याबाबतही संभ्रम आहे. मात्र अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, काही महिलांना हा हप्ता मिळणार नाही. ज्या महिलांचे वार्षिक कुटुंब उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या सरकारी कर्मचारी आहेत किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, तसेच ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.लाडकी बहीण योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा आर्थिक आधार देणे. त्यामुळे पात्र महिलांनी वेळोवेळी आपले माहिती व कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
महिलांनी आपले खाते तपासत राहावे आणि जुलै अखेरपर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता लक्षात घेऊन संयम बाळगावा, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.