Ladki Bahin Yojana 
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होणार?

November and December Installment : लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्र करून बहिणींच्या बँक खात्यात ३००० रुपये जमा होणार आहेत.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलीय. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ३१ डिसेंबर आनंदाचा ठरणार आहे. त्याच कारण म्हणजे, डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एक सोडून दोन हप्त्याचे पैसे जमा होतील. महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत. बँक खात्यात १५०० रुपये नाही तर ३००० रुपये जमा होतील.

डिसेंबर महिना सुरू झाला पण आतापर्यंत लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये. वृत्तानुसार, यावेळी नोव्हेंबर आणि डिसेबर महिन्याचे दोन्ही हप्ते बँक खात्यात जमा होणार आहेत. अनेकांना नोव्हेंबर महिन्याचा सन्माननिधी मिळालेला नाहीये. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांमुळे अनेकांच्या खात्यात पैसे आले नसावेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाभार्थ्यांच्या खात्यात एकाचवेळी दोन महिन्यांची रक्कम जमा झाली होती.एका अंदाजानुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाहीये. दरम्यान जर तुम्ही अजूनही E-KYC केली नसेल तर ही प्रक्रिया पूर्ण करा.

  • लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ते मिळणार.

  • एकूण रक्कम बहिणींच्या बँक खात्यात ३००० रुपये जमा होईल.

  • काही लाभार्थ्यांना अजूनही नोव्हेंबर हप्ता मिळालेला नाही.

  • लाभार्थींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा