राजकारण

बदलापूर पालिकेतील शिवसेनेचे २५ नगरसेवक शिंदे गटात सामील

Shinde Group : वामन म्हात्रे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व नगरसेवकांचा होणार प्रवेश

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बदलापूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाचे (Shinde Group) बळ वाढतच आहे. बदलापूर पालिकेतील शिवसेनेचे (Shivsena) सर्वच्या सर्व म्हणजेच २५ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिवेसनेला मोठा धक्का बसला आहे.

बदलापूर पालिकेतील शिवसेनेचे २५ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असून ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, अंबरनाथ पंचायत समिती सभापती अनिता निरगुडा, अंबरनाथ तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी हे देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी नंदनवन बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवेसनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. परंतु, शिवसेनेतून शिंदे गटात जाण्याचे प्रमाण वाढतच आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा