Aaditya Thackeray Team Lokshahi
राजकारण

आदित्य ठाकरेंना आवरला नाही ड्रम वाजवण्याचा मोह; नेटकरी म्हणाले, शिंदे गटाला 2024 नंतर....

आदित्य ठाकरेंचा एक वेगळाच अंदाज मुंबईकरांना पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांचा वाद्य वाजवताना व्हिडिओ त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

Published by : shamal ghanekar

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे नेहमीच राजकारणामुळे चर्चेत असतात. पण आता ते वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आले आहेत. आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मुंबईकरांना त्यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आदित्य ठाकरे यांचा वाद्य वाजवताना व्हिडिओ त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

मुंबईतील जुहू चौपाटी येथील ‘बिर्ला लेन’चं उद्घाटन शुक्रवारी आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तिथे आफ्रीकन बेंजो ड्रम वादन सुरू होते. यावेळी आदित्य ठाकरेंना तिथे सुरु असलेल्या आफ्रिकन जेंबे वाद्य वाजवण्याचा मोह आवरला नाही.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्या खासदार निधीतून मुंबईतील जुहू चौपाटी येथे बिर्ला लेनचे (Birla Lane) सुशोभिकरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. ‘बिर्ला लेन’चं उद्घाटन शुक्रवारी आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्ताने टॉस जिंकून फलंदाजी निवडली

Jaipur Accident : जयपूरमध्ये भीषण अपघातात संपुर्ण कुटुंब उध्वस्त! हरिद्वारहून अस्थी विसर्जन करून परतत असताना...

Assam Earthquake : रशियानंतर आता आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

A. T. Patil Jalgaon : 'माझ्याशी दुश्मनी घेऊ नको, तुला...', माजी खासदार ए.टी. पाटलांची कोणाला धमकी?