राजकारण

शिंदेंवर आदित्य ठाकरेंकडून शेलक्या भाषेत टीका; म्हणाले, मी आतापर्यंत इतका...

एकनाथ शिंदे यांनी आज पाणी साचलेल्या जागांना भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर शरसंधान साधले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणचा परिसर हा जलमय झाला होता. शहरात जागोजागी पाणी साचल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या जागांना भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर शरसंधान साधले आहे. निर्लज्ज सरकार आहे. मी आतापर्यंत इतका निर्लज्जपणा कधी पहिला नाही, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

मुंबईत आणि महाराष्ट्रात खोके सरकार आहे. महानगरपालिकेवर त्यांची हुकुमशाही चालू असताना वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन मोठ-मोठे भ्रष्टाचार करण्यात आले. याच शिवसेना भवनात बसून आम्ही रस्त्याचे अनेक घोटाळे तुमच्या समोर मांडले होते. जो काही घोटाळा झाला आहे त्यासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत. त्याची चौकशी तर होईलच. ज्यांना अटक करायची त्यांना आम्ही आमचं सरकार आल्यावर अटक तर करूच, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे.

काल मुंबईमध्ये कधी पाणी तुंबत नाही तिथेही पाणी तुंबले. घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते मला काय माहित? त्यांचं एक स्टेटमेंट वाचलं की पाऊस आल्याचे स्वागत करा तक्रार काय करता?? निर्लज्ज सरकार आहे. मी आतापर्यंत इतका निर्लज्जपणा कधी पहिला नाही, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

दोन गोष्टींवर आपल लक्ष वेधले आहे. रस्ते घोटाळा आणि नाले सफाई. या सरकार ने वेगवेगळी आश्वासन दिले. दहीहंडीला हे खेळाचे दर्जा देणार होते. एक सुद्धा आश्वासन पूर्ण नाही. रस्तेमध्ये सहा हजार कोटी चा घोटाळा आहे. जेवढ्या मिटिंग महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी झाल्या. तेवढ्या बैठकही यासाठी झाल्या असत्या तर असे स्टेटमेंट द्यायची वेळ आली नसती. जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्यायले एकही मिंधे गटातील कोणी आला नाही.

रात्रीची पाहणी करण्यासाठी आपण फिरलो होतो. उद्धव ठाकरे स्वतः नाले सफाईसाठी प्रत्येक विभागात जायचे. किती पंप चालू आहेत किती नाहीत कुठे पाणी साचेल अशी सर्व आपण पाहणी करायचो. पंप वाढवले असे घटना बाह्य मुख्यमंत्री बोलले पण ते कुठेही दिसले नाहीत. आम्ही जिथे जिथे पाणी तुंबते तिथे आम्ही जायचो आणि काम करून घ्यायचो. पण यांचे हे स्टेटमेंट बघून घटनाबाह्य मुख्यमंत्री यांचा बालिशपणा दिसतो, असा निशाणाही आदित्य ठाकरेंनी साधला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा