Aditya Thackeray Chandrashekhar Bawankule Team Lokshahi
राजकारण

मी योगीजी म्हणालो, औरंगजेबजी नाही; आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंना टोला

औरंगजेबजी म्हणणाऱ्या भाजपच्या बावनकुळेंना आदित्य ठाकरेंची शालजोडीत टोलेबाजी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी वरळी कोळीवाडा येथील गोल्फादेवी यात्रेला भेट देत देवीचं दर्शन घेतलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी औरंगजेबजी असं म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना शालजोडीत टोला लगावला आहे. मी योगीजी म्हणालो औरंगजेबजी म्हणालो नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काल योगीजी येऊन गेलेले आहेत. मी योगीजी म्हणालो औरंगजेबजी म्हणालो नाही जसे ते बोलतात तसे, असा टोला त्यांनी लगावला आहे. इतर मुख्यमंत्री आपल्या राज्यात येतात आणि त्यांच्या राज्यासाठी काही घेऊन जातात. पण, आपले मुख्यमंत्री दिल्लीत जातात आणि स्वतःसाठी घेऊन येतात, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

राज्याचा घसरलेला जीडीपी, गुंतवणुकीवरून युवा बेरोजगार आहेत. राज्यात राजकीय पातळी घसरत चालली आहे. आता जीडीपी घसरायला केळ्याची साल सहा महिन्यांपूर्वी कुणी टाकली हे लक्षात घ्या, असं म्हणत शिंदे गटावर तोफ डागली.

आपल्या राज्यात नवीन गुंतवणूक येताना दिसत नाही. राज्यात कोणीही गुंतवणूकदार यायला इच्छुक नाही आहे. राजकीय पातळी घसरत आहे. पण सर्व पक्षांनी एकत्र येऊन राज्याच्या विकासासाठी बोललं पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा