राजकारण

माझी जरी भट्टी असेल तरी मला पकडा अन् टायरमध्ये घाला; अजित पवारांनी पोलिसांना सांगितले

अवैध दारू हातभट्ट्यांप्रकरणी अजित पवारांनी पोलिसांना धरले धारेवर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रशांत जगताप | सातारा : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या कडक स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. जवळचा कोणीही पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता असो किंवा प्रशासनातील कोणताही अधिकारी असो तर तो चुकीचे काम करत असेल तर अजित पवार जाहीरपणे कानउघडणी करत असतात. असाच प्रकार बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी गावात सभेदरम्यान घडला.

अजित पवार बोलत असताना पाहुणेवाडी गावातील नागरिकांनी गावात अवैधरित्या दारू हातभट्ट्या सुरू असल्याची तक्रार केली आणि अजित पवारांनी पोलिसांना धारेवर धरत चांगलीच कान उघडणी केली.

पोलिसांची कामे आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मी करतो. पोलीस प्रशासन निवांतपणे आपला पगार घेईल. पाहुणेवाडी गावातील अवैध हातभट्ट्या आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मी शोधत बसतो. पोलीस प्रशासनाला मी वारंवार सांगितला आहे की मी कोणत्याही कामात हस्तक्षेप करत नाही. मात्र, पोलिसांच्या या अशा कर्तृत्वाला मी सॅल्यूटच करतो, असा उपहासात्मक टोला अजित पवारांनी पोलीस प्रशासनाला लगावला आहे.

माझी जरी भट्टी असेल तरी मला पकडा अन् टायरमध्ये घाला, असे अजित पवारांनी म्हणताच सभेमध्ये एकच हशा पिकला. यामुळे आता बारामती मधील पोलीस प्रशासन बारामती तालुक्यातील हातभट्टी व्यवसायिक धारकांवर कारवाई करणार का? हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक