राजकारण

छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षकच; अजित पवार ठाम

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. अजित पवारांविरोधात भाजपने ठिकठिकाणी आंदोलने केली असून राजीनाम्याची मागणी केली आहे. मला भाजपने विरोधी पक्ष नेते पद दिलं नाही. राष्ट्रवादीने दिलं आहे. म्हणून त्यांनी माझ्या राजीनाम्यांची मागणी करणं योग्य नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

अजित पवार म्हणाले की, अधिवेशनात अंतिम आठवड्यात मी काही भाष्य केलं त्याचे काही भाग दाखवले जात आहेत. गेल्या दोन-एक दिवसात बऱ्याच काही घटना महाराष्ट्र मध्यरात्री घडत आहेत. मला जनतेला बोलायचं आहे की आम्ही ज्या सरकारमधून मी काम करत होतो. तेव्हा मी अर्थसंकल्प सादर केला होता. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी माविआकडून निधी देण्यात येणार आहे. छत्रपती शौर्य पुरस्कार योजना देण्यात येणार आहे, असं मी बोललो होतो. ताबडतोब मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामाला लागलो. 15 जुनला बैठक झाली. त्यात या सगळ्याला मान्यता दिली होती. उच्च अधिकारी समितीच्या बैठकीत देखील मान्य निधीसाठी मंजुरी दिली. 30 जूनला विकास आराखड्यासाठी जीआर निघाला. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अशाच पद्धतीचा उल्लेख त्यात आहे.

मला एका गोष्टीची गंम्मत वाटते मी कुठल्याही महापुरुष बदद्ल काही चुकीचं विधान केले नाही. गेले दोन दिवस भाजपने कार्यकर्त्यांना सांगितले की आंदोलन करा. मला काही कार्यकर्त्यांनी फोन केला आणि बोलले की आम्हाला आंदोलन करण्यास सांगितलं आहे. जिथे आंदोलन होत आहे तिथे फोटो काढून ऑफिसला द्यायचा असं सांगण्यात आलं आहे. जे आंदोलन करत आहेत त्यांनी आंतर मनाला विचारावं की त्यांना हे योग्य वाटतंय का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. महापुरुषांचा अपमान राज्यपाल महोदय व मंत्र्यांनी यांनीही केला आहे. त्यांच्या नेत्यांबदल कोणीच काही बोलत नाही याची नोंद सगळ्यांनी घ्यावी. त्यांना देखील बोलले तर ते उचित होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

भारतीय संविधानात सगळ्यांना मत मांडण्यात हक्क आहे. शरद पवार यांनी काही माहिती दिली आहे. शरद पवार यांनीही माझ्या विधानाशी सहमत असल्याचे सांगितले आहे. या सगळ्यांना गोष्टीत इतिहासातील संशोधक आहेत त्यांनी काम केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. संभाजी महाराज यांनी रक्षण करण्याचे काम केलं. स्वराज्यात सगळ्याचे जाती धर्माचे लोकं राहत असतात. असा मी काय गुन्हा केला आहे की चुकीचं काही बोललो आहे. अशातला ही कुठला भाग नाही.

राजीनाम्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, मला भाजपने विरोधी पक्ष नेते पद दिलं नाही. राष्ट्रवादीने दिलं आहे. म्हणून त्यांनी माझ्या राजीनाम्यांची मागणी करणं योग्य नाही. अजित पवार कुठे दिसेना असं बोलतात इतकी का माझी आठवण येते, असाही टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

मी इतिहासाचा संशोधक नाही. तो इतिहास संशोधकाचा विषय आहे. अमोल कोल्हे यांनी देखील भूमिका मांडली आहे. इतिहासाच राजकारण करणे मला मान्य नाही. दादोजी कोंडदेव नावाने पुरस्कार दिला जायचा. आज त्यांना स्वराज्य रक्षक म्हणावं हीच माझी इच्छा आहे. माझ्या माहितीप्रमाणे स्मारक आणि पुरस्कार यांच्या बदद्ल बोलत होतो. सुचनेच स्वागत करू असं त्यांनी बोलायला पाहिजे. पण, त्यांचा विरोध आहे असं वाटतंय, असे अजत पवार यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा