राजकारण

ही काय धर्मशाळा आहे का? सभागृहात अजित पवारांचे रौद्ररूप

विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात संतापले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सभागृहाचे कामकाज सुरु असताना अनेक सत्ताधारी सदस्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गराडा घालून आपल्या अर्जावर शेरे व सह्या मारून घेण्याचे काम सुरु होते. काही काळ असाच प्रकार सुरु राहताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला, त्यांनी थेट आम्ही काही बोलत नाही म्हणजे काहीही चालेल का? ही काय धर्मशाळा आहे का ? कोणी ही कसेही वागायला? असा संतापही व्यक्त केला. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवारांचे रौद्ररूप पाहताच सर्व सत्ताधारी सदस्य आपापल्या जागेवर जाऊन बसले.

राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री बोलल्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याभोवती जमून सत्ताधारी सदस्यांनी गराडा करुन आपल्या अर्जांवर शेरे व सह्या करून घेण्याला सुरुवात केली. हा प्रकार काही काळ असाच सुरु राहताच विरोधी पक्षनेते चांगलेच संतापले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सत्ताधारी सदस्यांना समज दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे रुद्रारुप बघून पुन्हा सभागृह सुरळीत सुरू झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी ब्राझील दौऱ्यावर! दहशतवाद आणि जागतिक व्यापार अजेंड्यावर चर्चा?

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Pappu Yadav Challenges Raj Thackeray : "ही गुंडगिरी थांबवली नाही तर..."; पप्पू यादवची राज ठाकरेंना धमकी

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक