राजकारण

भाजपसोबत जाणार का? अंजली दमानियांच्या दाव्यावर अजित पवारांचे एका वाक्यात उत्तर

अंजली दमानिया यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत मोठा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. याबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया?

आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गंमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत तेही लवकरच. बघू आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असे अंजली दमानिया यांनी ट्विट केले आहे. यावर अजित पवार म्हणाले की, अंजली दमानियाबाबत मी काय बोलणार नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका असल्याची तक्रार पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत अजित पवार यांनी माझ्यापासून कुणाला धोका‌ नाही. राजकीय धोका मात्र होऊ शकतो. ज्याने तक्रार दिलीय त्याला स्टेन गन घेऊन संरक्षण द्यावे, अशी मिश्किल टिप्पणी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती